शोध अस्तित्वाचा
शोध अस्तित्वाचा


अस्तित्वाचा शोध घेता माझाच मी.....
कसं? कुठं? काय? किती? पसरलेलं आयुष्य आवरत गेले मी .
परिस्थितीचे तडाखे, चटके बरेच काही मज शिकवून गेले.
हृदयांवर जखमा, ओरखडे काही तसेच राहून गेले.
माणूस पण म्हणजे काय ते मला समजून गेले.
अहंभाव काही मनातले माझ्या पार गळून गेले.
सरत्या आयुष्यपुस्तकातील चुका मी स्विकारत गेले..
प्रामाणिकपणे खोडायच्या होत्या मज काही
राहूनच गेले..
मिळालेल्या अनुभवाचे दाखले मी मोजत गेले.
शिफारशी, प्रमाणपत्र धुंडाळता कागदपत्र काही वाचायचे राहून गेले.
नात्यातले अंत
र मी माणुसकीने जवळ करत गेले..
पण वेळ गेली निघून दूर, मी पुरती थकून गेले.
मनात आठवणींची काही दाटली होती गर्दी.
आयुष्य वाचता रद्दीत त्या माझी मीच हरवून गेले.
शोध घेता अस्तित्वाचा नकळत जाणिवेचा बोध मज देऊन गेले.
जीवन पुस्तकाचं झाले प्रकाशन मनात मी स्तब्ध होवून गेले
जीवन पुस्तक वाचता काही प्रसंग अश्रूंना मुक्त
करून गेले..
सरलेल्या आयुष्यपटात मन रंगभूमीवरील कलाकार मी होऊन गेले..
अजूनही आयुष्याची कोरी पाने शिल्लक देऊन गेले.
लिहिण्यास मज मृत्यू पर्यंतची अवधी देऊन गेले.