Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Charushila Dhumal

Classics

2.5  

Charushila Dhumal

Classics

आई

आई

1 min
13.9K


आई पहिलं वहिलं जग!

प्रेमाच सजीव एक गाव!

नऊ महिने गर्भ सरितेत,

सांभाळणारे भरभक्कम नाव!


रुप साकारणारी आई,

देहाला आकारणारी आई,

पहिली वहिली शाळा आई,

जगायला शिकवणारी आई!


संस्कारांचे मोती भरणारी,

वात्सल्याची अथांग मूर्ती !

लेकरांसाठी संकटाशी झुंज देणारी

अलौकिक शक्ती!


लोचनांत तिच्या सदोदित चिंता,

काळजी, स्वप्न ,दिलासा ,विश्र्वास

लेकरांसाठी चालेतिचाआटापिटा 

कधी खंबीर; धीर ,गंभीर; करुणेची आस!


कोणीच करू शकणार नाही,

आईच्या मायेची बरोबरी;हेवा!

प्रेमरुपी साक्षात अमृताचा झरा!

विधात्याचा अलौकिक ठेवा!


भूलोकीचे सौंदर्य नंदनवन,

एकवटले तूझ्या गं वात्सल्यात!

ब्रम्हांडातलं ईश्वरीतत्व तूअन्नपूर्णा!

तूझ्या ममतेच्या गं हातात...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics