मोबाईल दे
मोबाईल दे


मूळ काव्य:
आई आई ये इकडे
माझे गाणे ऐक गडे
देश माझा हिंदुस्थान
त्याच्या साठी देईन प्राण
मूळ रचनाकाराची माफी मागून
विडंबन काव्य
मोबाईल दे
आई, आई, तू ये इकडे
माझा मोबाईल दे ना गडे
मोबाईल माझा किती छान
त्याच्यासाठी घेईन प्राण
खेळ मैदानी नको मला
भीती लागते वाटायला
पाय मोडला काय करा
मोबाईल मधला खेळ बरा
हाती मोबाईल घेईन
चित्रं त्यातले पाहीन
खेळ नवनवे खेळीन
चॅटिंग करत मी राहीन
मित्र मैत्रिणी भेटतील
मजशी चॅटिंग करतील
ग्रुप तयांचा मी बनवीन
मेसेज तयांना पाठवीन
चिंता का गं करतेस तू
उगाच टेन्शन घेतेस तू
अभ्यासही थोडा करीन
टेन्शन तुझे मी घालवीन
*****
पंडित वराडे,
औरंगाबाद.
१३.०८.२०१८ प्रवास व्