कविता - पुस्तके
कविता - पुस्तके


पुस्तकाच्या पानापानात
ज्ञानाचे वाहती अमृत झरे
पण जे वाचतील पुस्तके
त्यांनाच ज्ञानामृत मिळेल खरे
पुस्तकात भरपूर असतो
साठवलेला ज्ञानाचा ठेवा
प्रत्येक पुस्तकातून पेरला
जातो विचार नवा-नवा
पुस्तका ला बनवा
आपले चांगले मित्र
विचार संपन्नतेतून उमटेल
समाजात सुरेख चित्र
पुस्तके म्हणजे नाही
केवळ पानांची रद्दी
त्यांनाचं वाचून वाचून
माणूस बनतो मुसद्दी
शहाणपण प्राप्तीसाठी
पुस्तके लागतात वाचावी
आला जरी माउस हाती
डोळ्यात अक्षरे नाचावी
पुस्तके वाचनाचा मनास
लावून घ्या सुरेख असा छंद
दरवळू द्या तुमच्या ज्ञानाचा
समाजात अत्तरासम सुगंध