प्रेम
प्रेम
सार काही मिळवता येत आयुष्यात
प्रेम मिळवता येत नाही
भाग्य ते लागत ललाटी
त्याशिवाय भावना ती
समोरच्याला कळत नाही
असेल जर ते कोणाच्या नशिबात
भेटल्याशिवाय राहत नाही
प्रेम हि भावनाच वेगळी
प्रेमात पडल्याशिवाय कळत नाही
उगीच नका नाव ठेवू प्रेमास
प्रेमासारखी गोष्ट नाही
प्रेमात पडल्यावर स्वतःस विचारू पाहावं
हे आकर्षण तर नाही
जेव्हा प्रेम कळून येत
कुठल्याही क्षणी सोबत करत
एकमेकांच्या सुखासाठी धडपडून
आयुष्य दोघांच सुंदर होत
प्रेम हि भावना कळल्याने
आयुष्य सुंदर होवून जात

