STORYMIRROR

Shivani Hanegaonkar

Abstract Inspirational Others

3  

Shivani Hanegaonkar

Abstract Inspirational Others

स्त्री

स्त्री

1 min
151

रोजची काम आजही तुला चुकणार नाही...

गृहिणी पदातूून आजही तुला सुट्टी मिळणार नाही....


स्वयंपाकात काय बनवू आजही मोठा प्रश्न पडेेल...

" मुले शाळेतूून नीट घरी येतील का?" दरवाजाकडे लक्ष असेेल....


" सासूबाई गोळ्या घ्या " तु आठवण करून देशील....

घाईत सकाळचा नाश्ता करायचा मात्र तु विसरशील....


दळण करायचे, लाईटबिल भरायचे, ह्या महिन्यात मुलीचा वाढदिवस आहे...

भलीमोठी लिस्ट तुझ्या डोक्यात असेल...

महिना झाल पाठ दुखतंय तुझी याकडे माात्र दुर्लक्ष दिसेेल....


नवऱ्याच्या खांद्याला खांदा मिळवत तुझे करिअर तुु उत्तम सांभाळशील...

मुलांच्या इच्छा पूर्ण करता करता स्वतःच्या

इच्छेला मात्र मुरड घालशील....


लेक तु, बायको तु , सुन तु, आई तु सगळ्या जबाबदाऱ्या तु पार पाडशील....

स्वतः लाही जप थोड नाहीतर तुझ्यातली तुच हरवशील....


झिरो फिगर, रोमॅंटिक डेट, तुझी कोणीतरी घेेतलेेली काळजी इति तुला फक्त स्वप्नातच दिसेेल...

पण आजच्या दिवशी संंकल्प कर," माझ्या कुटुंबाला माझी गरज आहे म्हणूनतरी मी स्वतःला जपले....     


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract