मी अनुभवलेला पाऊस
मी अनुभवलेला पाऊस
गळक घर माझ गळू लागलं
तरी पाऊस मला हवा होता...
घरापेक्षाा माझं शेत महत्त्वाचं
त्यामुळे चुलीवर तवा होता
थेंब थेंब घरात साचत जातो
माय ती पाणी काढत जाते
थेंब थेंब शेतात पडत जातो
धान्याचे पोते ते भरत जाते
भिजलं माझं आज घर जरी
तरीही मी कसातरी जगेन ना
माझं शेत जर उद्या पिकलं
तर जगाला पुरून उरेलच ना
पिकेल माझ रान बांधील घर
पूर्ण करेल मी माझी हाऊस
हेच माझ वाक्य येेत दरवर्षी
असा मी अनुभवलेला पाऊस