आपण सर्व एकच प्रतिभेचे धनी ...
आपण सर्व एकच प्रतिभेचे धनी ...


चला आता आईवर नाही तर गायीवर लिहून काढून निबंध कि कविता ?
तुम्ही डॉ. समीक्षक , प्राध्यापक मान्य पण... कवी नसालही कदाचित
प्रतिभासंपन्न ,उत्कट भावनेतून दोन चार शब्द अलगद सांडले ..
संवेदनशीलतेने ते अचूक टिपले ,गर्भार भूमीत जसे बीज अंकुरले
यमकाची भाऊगर्दी , आवेशाने ... ओढून ताणून , अलंकारात बसविणे
त्यात काय एवढं ? कवी काय ढगातून अवतरतो ? मी ही करतो कविता
दैवी देणगी म्हणा नाही तर नवोन्मेषशालिनी प्रज्ञा ती दुर्मिळ असते ..
म्हणून तर चार बुक न शिकणारी बहिणाबाई हसत- खेळत तत्वज्ञान शिकवते
प्रतिभा असते जन्मजात , त्यातूनच अंतर्मनाचे उमटतात पडसाद
कुणी सांगावं ह्यांना ? इतकी सोप्पी नसते रे कधीच कविता...
कु
णी उठावं , लिहत सुटावं असा नसतो कवी अन अशी नसते रे कविता .
ती कलावादी ,जीवनवादी, असो कि असो विद्रोही पण ती कविता तर असावी ?
भलेही ती नसेल छंदात , वृत्तबंधात पण तिनं अंतरंगत लयीत तर असावं
निरागस मुलं होऊन समाजमनाचा संस्कार सोहळा तिनं जरूर दाखवावं ..
तर कधी मानवाप्रतीची अपार करुणा बिनधास्त चित्तर्राव, क्रांतीगान ठरावं
कवी जगात असो या नसो पण कवितेने रसिकाच्या मनात कायमचघर करावं , रुजावं...
कवीने कवी म्हणून जरूर मिरवावे पण कुणा न कधीच हीन लेखावे
साहित्य संमेलन जरुर भरवावेत पण... त्यातून खरे लेखक कवी घडावे
त्यांनी घ्यावी दक्षता नवकवी , लेखक कसे घडतील ? याची मनापासून
श्रेष्ठ - कनिष्ठ काही नसतं ? आपण सर्व एकच प्रतिभेचे धनी, देवाची लाडके ...