STORYMIRROR

Manjusha Swami

Abstract Inspirational

3.8  

Manjusha Swami

Abstract Inspirational

माणूस

माणूस

1 min
617


  शब्दांचे बघ कसे कोणीतरी पंख छाटले !

  भावनांचे उरी पेटून आज वादळ उठले !! //१//


  काहूर दुःखाचे इतके जगी दाटले !

  भ्रष्ट माणसे कसे बघ इथे साचले !! //२//


 हव्यास पैशाचा बघ माणसा मनी कोपला !

 जो तो अनितीने कायमचा इथे निजला !! // ३ //


शोषितांचा ना कोणी इथे बघ वाली !!

 पेटून उठण्याची वेळ आज तुझी झाली !// ४//


 होती आपुले पूर्वज कसे पाहा शानदार !

  तितकेच बनू आपुण रे माणसा दिलदार !! // ५//

Advertisement

-justify">

तोडून टाक कायमची तु जातीची चौकट !

रोखू नकोस रे माणसा अधोगतीची सावट !! // ६//


 अरे मानवा कर रिकामी द्वेषाची तु घागर !

पाहा मग साचेल कसा माणुसकीचा सागर !! //७//


आज कसा लागला तुज प्रसिद्धीचा जीवघेण्या रोग !

जाग माणसा नसता सोसावे लागेल नैराश्याचे भोग !! // ८//


  माणसाच्या गर्दीत आज माणूसच हरवला !

शोधण्या येता आज देवच पाहा गहिवरला !!//९ //


इतकेच बघ माणसा मज आज रे कळते !

माणसातला माणूस जागण्या काळीज तुटते !! // १० //


Rate this content
Log in

More marathi poem from Manjusha Swami