STORYMIRROR

kishor zote

Abstract

2.5  

kishor zote

Abstract

नाते - १ ( शिरोमणी काव्य )

नाते - १ ( शिरोमणी काव्य )

1 min
42.6K


नाते

असावे असे

दृष्ट नको त्यास

जीवापाड हे जपावे तसे


नाते

सांभाळावे तसे

गैरसमज ते नसावे

सदा त्यात आपलेपण असावे


नाते 

सांभाळता पाहा

दमछाक ती होते

मजा परि त्यात येते


नाते

जुळून येताना

वसंत तो बहरला

रात्री अंगणी पारिजात बहरला


नाते

अत्तर कुपीचे 

आत सुगंधी राहते

खोली कवाडे ती मनाचे


नाते

होता अबोला

धीर तो धरावा

संयम सदा तो पाळावा


नाते

असावे जीवनी

तीच असे संजीवनी

सुख शांती अन् समृद्धीची



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract