STORYMIRROR

Kishor Zote

Drama Classics Others

3  

Kishor Zote

Drama Classics Others

किरण आशेचा( अभंग रचना )

किरण आशेचा( अभंग रचना )

1 min
486


गतकाळ गेला । चिंता ती कशाला ।

पहा ती उशाला l पहाट ही ॥ १ ॥


होते दयायचे ते । मुठीत तसेच ।

रहीले असेच । क्षण भर ॥ २ ॥


नको आठवणी । डोळे होता ओले ।

किती तरी गेले । निसटून ॥ ३ ॥


पाऊल पडते । पुढचे पुढेच ।

कशाला उगाच । आकांत तो ॥ ४ ॥


स्वप्न पहाटेचे । प्रत्येय सत्याचा ।

किरण आशेचा । डोकावत ॥ ५ ॥


Rate this content
Log in