पाऊसधारा प्रितीच्या
पाऊसधारा प्रितीच्या


पावसाचा थेंब गालावर झेलतना
प्रिये तु ठसतेस स्पंदनी,
पावसात ओल्या चिंब मनात
उसळती लाटेसम आठवणी …
‘बेधुंद’ गारवा प्रीतीचा
रुधिराला स्पर्शून जातो,
सुगंध प्रेमळ मातीचा
श्वासात भिनत राहतो ....
गगनी काळ्या नभांची गर्दी
मेघ आठवणींचे दाटून येई,
रिमझिम रिमझिम पाऊसधारा
ह्रुदयात समिंदराला उधाण येई ...
आसमंतात मातीचा दरवळे सुगंध
दाही दिशेला आनंदी आनंद,
आठवणी पावसातील गमतीच्या
येता होई हृदय बेधुंद