सावली
सावली


चाटून गेला मम पायासी
तो द्वाड उनाड वारा
अलगद स्पर्शता पायी
वाटला मज तो खरा...
काय मनी त्याच्या
देवच जाणे वाटले
पण प्रेम अनाहूत
सखे मनी गे दाटले....
गोड गोड मधुर
अती मज तो भासला
अंतरात गे माझ्या
त्याचा चेहराच अवतरला....
लाजले बावरले मी
अंग अंग शहारले
पुलकित होता अचानक
सामोरी त्यास पाहता लाजले...
तो राजकुमार स्वप्नीचा
मज सामोरी ठाकला
मुगजळा सम तो
क्षणभर मज वाटला....
कवेत घेता अलगद
विसरले भान मी
मी माझी न उरले
त्याला घेता सामावूनी...
ती आस मनीची
तृप्ततेकडे झेपावली
जाताना फक्त
फक्त मज दिसली सावली....!!