STORYMIRROR

Priyanka Kardekar

Children Drama

3  

Priyanka Kardekar

Children Drama

"आई तुझ्या कुशीत"

"आई तुझ्या कुशीत"

1 min
29.4K


काही मला बोलायचे,

मनातले गुज सांगायचे,आई

मला तुझ्या कुशीत निजायचे.

शोनूली,छकुली आई तुझीच मी परीराणी,

आज तिच्या डोळा आहे सुकलेले पाणी.

पापण्यांची ओल पुसायचे,    

आई मल तुझ्या कुशीत निजायचे.

खेळण्याचे आहे वय,

मला अंगणाची आहे सय.

अंगणी त्या मला खूप खेळायचे,

आई दमून तुझ्या कुषाण निजायचे.

वळणावरिल प्रवास वाटे अवघड हया पाउली,

माप ओलांडून दूर जाईल मझी भातुकली.

कोवळ्या वयात भाळी मळवट नाही झेपायचे,

आई मला तुझ्या कुशीत निजायचे.

लेक लाडकी असूनहि ह्या घरची,

तुझ्यासाठी मात्र नेहमीच परकी...

सून असता कोण्या घरची,

नशीबी सदैव चुल- बोळकी...???

लेक परक्याच धन मला खोडायचे,

आई मला तुझ्याच कुशीत निजायचे

मला तुझ्याच कुशीत निजायचे...

 

 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Children