STORYMIRROR

yuvaraj jagtap

Children

3  

yuvaraj jagtap

Children

बालगीत - "गोगलगाय"

बालगीत - "गोगलगाय"

1 min
30.4K


गोगलगाय--गोगलगाय

इवलेसे घर तुझे

मऊ मऊ अंग

चाल तुझी मंद

चालण्यात तू दंग---

गोगलगाय--गोगलगाय

चाल जरी मंद तुझी

पहावा वाटतो तुझा थाट

सहज तुझी माझी

हल्ली पडत नाही गाठ-

गोगलगाय--गोगलगाय

तुझं घर तुझ्याच पाठी

घेऊन तू फिरते

संकटाची लागताच चाहूल

कवचात अंग चोरते --

गोगलगाय--गोगलगाय

घर तुझे सुंदर ते

डोंगरासम वाटते

कपारीतून जणू तू

आत जाते बाहेर येते






Rate this content
Log in

Similar marathi poem from Children