STORYMIRROR

Riya Lotlikar

Children Stories

4  

Riya Lotlikar

Children Stories

आमचं कार्टून विश्व

आमचं कार्टून विश्व

1 min
755

आई,तुमच्यावेळी होती का कार्टून्स?

-माझ्या मुलाचा प्रश्न आणि त्यावर माझे उत्तर            

अरे हे तुमचे पॉकेमोन, डोरेमोन काहीच नाही,आमच्यावेळीही होते ही मॅन, स्पायडरमॅन


चंपक,चांदोबा साठी रद्दीवाल्याकडे सेटिंग लावलेली असायची आणि एकदा का तो अंक हातात आला की काय तो आनंद व्हायचा, त्यातल्या गोष्टींत भान विसरून जायचो.त्यातला विक्रम-वेताळ भन्नाटच होता,नंतर टिव्हीवरचा तो सफेद कापड्यातला आणि लिपस्टिक लावलेला वेताळ नंतरही लक्षात रहायचा.

 

चाचा चौधरी आणि साबू-ह्यातल्या मोठ्या मिशांचा,बुटका,पगडीवाला आणि कॉम्प्युटर से भी तेज दिमाग असलेला चाचा आणि लंबूटांग साबू जो शत्रूला अशी जोरात लाथ मारायचा की तो डायरेक स्पेसमध्ये.


फॅटम तो जांभळा-निळा ड्रेसकोड,काहीसा बॅटमॅन सारखाच,गुहेत राहणारा आणि त्याची खोपडीवाली अंगठी -जो तो शत्रूच्या गालावर खूण म्हणून द्यायचा.


टीव्ही वर आम्हाला स्पायडरमॅन चं पुचुक-पुचुक करून जाळी काढून इथून तिथे जाण खूप आवडायच.


ही मॅन,त्याचा तो वाघ,त्याची डरकाळी आणि ती तलवार एकदम भारी वाटायची.


चल ये जायंट रोबो म्हणत आम्ही पण उगाच फुशारक्या मारायचो.


त्या स्टार ट्रेक मधलं काही कळत नसलं तरी त्यातला मिस्टर स्पॉक च्या वाकड्या-तिकड्या भुवया मात्र लक्षात राहायच्या.


टॉम अँड जेरी, मिकी डोनाल्ड पण होतेच खळखळून हसवायला.


एकता का वृक्ष - एक मस्त,छान जाहिरात आणि कार्टूनद्वारे मुलांना हसायला लावणारी चलचित्र विभागाची सुंदर भेट होती,त्यामधली ती पात्र, सफरचंद,पायाने दूर सारणारी कुऱ्हाड,नंतरच त्यांचं फेर धरून गाणं म्हणणं,त्या गाण्याची ती मस्त ट्यून अजून लक्षात आहे.


असं होतं आमच्या वेळचं कार्टून विश्व(ब्लॅक अँड व्हाईट) पण सुंदर आणि निरागस.


Rate this content
Log in