शांतता
शांतता
शांत होता तो समुद्रकिनारा
आणि त्याच्या त्या लाटाही
शांत होता वाहणारा वारा
आणि त्यातला गारवाही
शांत होती दोन मने
आणि त्यामधली दडलेली गुपितेही
शांत होते ते डोळे
आणि त्यामधले निरागस भावही
शांत होती वाळूत फिरणारी बोटे
आणि ती कोरलेली नावेही

