प्रेम
प्रेम
प्रेम, प्रेम म्हणतात ते हेच का?
अगदी वेळेवर ये म्हणून सांगून
स्वतःच उशिरा यायचं
तुझ्या बोलण्यावर मी भान विसरून
नुसतं ऐकत राहायचं
अन तू केलेल्या विनोदावर
मी अगदी मुग्धपणे हसायचं
त्यावर तुझं माझ्याकडे एकटक
पहात राहायचं
निघताना अजून थोडा वेळ थांब ना
असं काहीतरी पुटपुटायचं
अन चोरून भेटण्यातच
खरी मजा असते
असं मनाला पटवून द्यायचं