प्रेम
प्रेम
1 min
276
सांग ना रे, यालाच का प्रेम म्हणतात
स्वप्नात येऊन शीळ घालणारा तुच ना
असं मनाला विचारावं
आज पुन्हा भेटशील का असं काहीसं तूला विचारायचं
तुझ्याशी खुप काहीतरी बोलावं असं मनाशी ठरवायचं
आणि तु भेटलास ना की, सर्व काही विसरून जायचं
बोलावसं वाटत असलं तरी मुकपणेच एकमेकांना बघत रहायचं
हातात हात घेऊन नुसतंच असं समुद्रकिनारी फिरायचं
त्या मावळत्या सूर्याला पाहून मनाशी काहीतरी ठरवायचं
आणि
तुझ्या खांद्यावर डोकं ठेवून आपल्या भवितव्याचं स्वप्न पहायचं