STORYMIRROR

Riya Lotlikar

Others

3  

Riya Lotlikar

Others

डायरी

डायरी

1 min
276

चुकून का होईना,आज माझी डायरी उघडीच राहिली

आणि नकळतच तुझीही नजर त्याच पानावर खिळून राहिली,

भातुकलीच्या खेळातली सखी,मला आज माझीच वाटू लागली,

वाचनात आले हे तुझ्या, तेव्हा काही काळ तुही दंगच राहून गेली,

माझ्या मनीचेही हेच भाव असे शब्दांद्वारे बोलून गेलीस,

कुशीत असलेल्या लेखणीने त्यावर असे काही लिहून गेलीस,

कवितेची सुरुवात मी केली असली तरी,सांगता मात्र तू केलीस.


Rate this content
Log in