प्रेम बंधन
प्रेम बंधन
प्रेम बंधन मानत नाही
तरीही, बंधनात अडकवतंच ना...!!!
सहज स्विकार होणार नाही ...
तरीही , कुणीतरी खास आयुष्यात असतचं ना...!!!
भरण्यासाठी आभाळ असलं
तरीही , त्या अथांग निळ्याशार निरभ्र आभाळात ...
न दिसणारं अदृश्य निर्वात पोकळीत साकार काहीतरी असतंच ना...!!!
त्याला होकार नकार ...
नसतोच कधीही ...
त्याला आकार , उकार नसतोच कधीही ...
तरीही , एक बंध असतो रेशमी ...त्याला मायेची ऊब असते .
मानणं अन् न मानणं तिथे विफल ठरतं ...
असच काहीसं जडतं...
तेच तर निर्व्याज प्रेम असतं .