STORYMIRROR

Shekhar Chorghe

Romance

4  

Shekhar Chorghe

Romance

पुन्हा कधी येईल का?

पुन्हा कधी येईल का?

1 min
27.9K


आजचा हा पाऊस पुन्हा कधी येईल का?

सांग सखे या देहावर तुझे राज्य पुन्हा कधी येईल का?

ढग सारे जमलेले त्या आकाशाच्या धरतीवर 

थेब सांडता नभातून सार्या ही मैफिल पुन्हा कधी येईल का?

सप्तरंग न्हाऊन गेले रविकिरणांना चुंबून गेले 

इंद्रधनू अन् त्या रविचा प्रणयप्रसंग पुन्हा कधी येईल का?

मेघ गर्जतो वरूण बरसतो धरणीही बहरून जाते 

संपला पाऊस अता या मातीचा सुगंध पुन्हा कधी येईल का?

आभाळ सारे भरून वाहिले दाही दिशा धुंदावल्या 

घनधरतीच्या प्रीतीचा हा मधूमास पुन्हा कधी येईल का?

लखलखल्या विजा किती या प्रलय तो ढगांचा झाला 

भयाने आलीस मिठीत माझ्या हा क्षण पुन्हा कधी येईल का?

या पावसात भिजणारे फक्त आपण दोघे 

सांग सखे प्रीतीची ही वसंतवर्षा पुन्हा कधी येईल का?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance