STORYMIRROR

Shekhar Chorghe

Romance

3  

Shekhar Chorghe

Romance

कॉफी

कॉफी

1 min
14.8K


ती म्हणते 

चहा घेणार की कॉफी 

मी लगेच म्हणतो कॉफी 

ती म्हणते का बरं 

मी म्हणतो 

मित्रांबरोबर असलो की चहा हवाच

पणे तू सोबत असताना कॉफीच पाहिजे 

तुझ्यासारखीच आतमध्ये भिनत जाणारी

ती हसते, लाजते, हळूच बोलते 

मलाही कॉफीच पाहिजे 

मी म्हणतो का बरं?

ती म्हणते 

त्या कॉफीत मला तूच जाणवतोस 

माझ्या अस्तित्वात विरघळणारा 

तेव्हा माझी मी राहात नाही 

माझं अस्तित्वच तू होऊन जातो 

मलाही तेच हवं असतं 

तुझ्या आत झालेल्या घरात 

मला राहायचं असतं 

म्हणूनच मी प्रत्येक वेळी एकच कॉफी मागवते 

कारण मला तुझ्या प्रत्येक घोटाबरोबर तुझ्यात विरघळायचं असतं 

अगदी माझीच मी न राहता.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance