STORYMIRROR

Shekhar Chorghe

Tragedy

2  

Shekhar Chorghe

Tragedy

सांगू कसा कुणाला

सांगू कसा कुणाला

1 min
2.9K


तुझ्या वा ह वा,  एक वेगळीच बात आहे 

तू माझ्या कवितेच्या प्रेमात अन् मी तुझ्या प्रेमात आहे.

तुझ्या डोळ्यातला भाव भलताच खट्याळ दिसतो 

हळूच सांगतो मला हा तू ही माझ्याच प्रेमात आहे 

टोचली जरी सुई फुलांना, होणार त्यांचा हार असतो 

दिसते जरी हार त्यांची, होणार त्यांचा विजय आहे 

नसले जर शब्द ओठी, हृदयात थोडी प्रीत असूदे 

जिवंत राहाण्या प्रीत पाहिजे, तूच माझा श्वास आहे 

गजर्याच्या गाडीपाशी एक भिकारी उभा दिसतो 

त्याचीही बायको अता शृंगार थाटते आहे 

सार्या जगात फक्त शांतताच दिसते 

म्हणूनी शस्त्रांचा येथे मांडला बाजार आहे 

तूच माझी सीता अन् तूच माझी राधा

या दोघींनाही पुन्हा फासणारा नवा रामकृष्ण जन्म घेणार आहे 

तुझे असले जरी माझ्यावरी प्रेम 

सांगू कसा मी तुला, मला जडला भलताच विकार आहे

नको येऊस तू स्वप्नात माझ्या 

तिथे अगोदरच अप्सरांचा भरला बाजार आहे

  

अता करीतो मदिरेला जवळ मी प्रत्येक रात्री 

सांगू कसा कुणाला तिच माझी यार आहे.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy