वाहू श्रद्धांजली
वाहू श्रद्धांजली
कालची बातमी आघात करते
विश्वासच नाही त्यावर बसत
भारतीयांचा आक्रोश असा
आपल्यात नाही बिपिन रावत ||
फक्त शौर्य नव्हते त्यांच्यात
होते तिनी दलाचे सेनापती
चालती बोलती होती तटबंदी
भारत देशात सुरक्षित ठेवती ||
काळालाही जसा हेवा वाटतो
म्हणूनी हवेत असा दगा देतो
जोआवडे सर्वांना तो देवाला
असे म्हणूनी वीर कवेत घेतो ||
प्रचंड कार्य , सेवा कालावधीत
शत्रू अनेक असतील भय चकित
येती मनात थोड्या शंका -कुशंका
घडला तो अपघात की घातपात ||
नक्कीच विचार करतील सेना
संधी मिळताच या दुर्घटनेची
शांती मिळो पुण्य आत्म्यास
श्रद्धांजली वाहू भावपूर्णतेची ||
