Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Smruti Ambegaonkar

Tragedy

4  

Smruti Ambegaonkar

Tragedy

कळीची किंकाळी

कळीची किंकाळी

1 min
20.3K


उंच उंच पहाडांचे ही हलले असेल लक्कन काळीज ,

त्यांच्यावरचा बर्फ सुद्धा बसला असेल अश्रू गाळीत !

 देवदारचे वृक्ष हि करत असतील करुण रुदन ,

अन म्हणतात ह्या जागेला पृथ्वीचे नंदनवन !

बंदुकीच्या गोळ्या अन काडतुसे काय कमी होती ?

इवलीशी कळी सुद्धा त्या नराधमांसाठी सावज होती !

धर्माचा अर्थ सुद्धा जीला मुळी ठाऊक न्हवता ,

त्या कोवळ्या फुलपाखराचा झाला काय गुन्हा होता ?

पंख तिचे कापताना, हात कसे कापले नाहीत ?

आर्त किंकाळ्यांनी तिच्या, कान कसे गोठले नाहीत ?

कन्यापूजनाची म्हणे आमच्या कडे फार महिमा ,

त्याच कन्येच्या शरीरावर दिल्या त्यांनी सह्यांशी जखमा ?

माणसानेच फ़ासलाय आज माणुसकीला काळिमा,

न्यायकर्ते झोपले आता न्याय कुठे मागावा ?

बोल द्रौपदी कशी ठेवशील लाज तुझी उरवून ?

थकला आता कृष्ण सुद्धा वस्त्र तुला पुरवून !

देवा अशा सुंदर कळ्या राहू देत तू तुझ्याकडेच ,

नको पाठवू पृथ्वीवर त्यांना, करपतात त्या रोज इकडे !

नको पाठवू पृथ्वीवर त्यांना, करपतात त्या रोज इकडे !!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy