STORYMIRROR

Smruti Ambegaonkar

Others

3  

Smruti Ambegaonkar

Others

कविता :- मी

कविता :- मी

1 min
13.5K


                           

दिवसांमागुन दिवस ही सरले ,

आयुष्याच्या वळणांवरले !

चालत असता या वळणांवर ,

किती अडखळले, किती धडपडले ,

अन माझीच मला मी सापडले !

काहीच मला का जमत नसे ,

हे न्यूनगंड मी मनात जपले ,

क्षमतेवरती प्रश्नचिन्ह ही 

मीच स्वतःचे , स्वतः लावले !

सुरेख बदके तळ्यात पाहत 

कुरूप पिल्लू स्वतःस म्हटले !

नको , "नाही" ला जोपासत मी ,

दुख्ख उराशी हे कवटाळले !

उगीच भलत्या आशंकेनी ,

माझेच जणू मी पंख कापले !

पण वाट चालता असे अचानक ,

मनातले मी मळभ झटकले ,

विचारांतल्या प्रगल्भतेला ,

आज अचानक जणू हे कळले ,

माझीच मला मी सापडले !

माझीच मला मी सापडले !!! 


Rate this content
Log in