भूक काय असते
भूक काय असते


भूक काय असते ?
विचारा अनाथांना
पोटाची खळगी भरण्यासाठी
फिरतात दारोदारी
भूक काय असते ?
विचारा गरिबांना
रिकाम्या पोटासाठी
फिरतात रानोरानी
भूक काय असते ?
विचारा भिकाऱ्यांना
असाहय साह्य मागण्यासाठी
फिरतात रस्त्यावरी
भूक काय असते?
विचारा असाहय म्हातारांना
वृद्धाश्रमात जाये आधारासाठी
माये वीना पोरकी सारी
.
भूक काय असते?
बेवारस मुलांना
वडापाव मिळण्यासाठी
चार पैका कमवणारी
भूक काय असते ?
अनुभवा दुसऱ्याच्या भुकांना
जगाचे दुःख अनुभवासाठी
असाह्यांना साह्य करी
भूक काय असते?
अनुभवा भुकेला
जो जगतो दुसऱ्यासाठी
जो दुरितांचा विचार करी