अंधश्रध्दा निर्मुलन
अंधश्रध्दा निर्मुलन


नको दारापुढे
उलटी बाहूली टांगू
बाहुली म्हणे तुम्हा
सांग तुला उलटे करू का मी?
कर बुध्दीचा वापर मानवा
नको दारापुढे
कोहळा टांगू
कोहळा म्हणे तुम्हा
जीवनसत्व युक्त मी
कर विज्ञानाचा वापर मानवा
नको गाडी पुढे
मिरच्या लिंबू बिब्बे टांगू
नजर न लागे तुम्हा
जीवनदायी मी
कर हेल्मेट चा वापर मानवा
नको बुव्वाबाजी पुढे
मागे लागू
कविता सांगे तुम्हा
अंधश्रद्धा सारी
दवाखान्यात जा मानवा
नका मारू बकरे देवापुढे
नकाअंधश्रध्देच्या मागे लागू
नका जीव निष्पापांचा घेऊ
जीव तळमळने सांगे तुम्हा
जगायचे होते मलाही मानवा
नतमस्तक होऊ विज्ञानापुढे
अंधश्रध्दा मनामनातून काढू
विज्ञान सांगे तुम्हा
श्रध्दा असावी अंधश्रध्दा नसावी
जरा जपून टाक मानवा .