स्त्री म्हणजे खेळणे नाही
स्त्री म्हणजे खेळणे नाही
स्त्री म्हणजे खेळणे नव्हे
ती सृष्टीवरचा साज आहे,
मानवाची ती उत्पती आहे,
ती नसेल तर मानव जन्म कसा घेणार ?
स्त्रीयांना हिन लेखू नका ती सृष्टीवरचा साज आहे...
आम्ही कर्तृत्वशाली दिव्य पताका
समजू नका कमजोर तट किनारा,
नको कुणाची दयादृष्टी,
सहानुभूती
सक्षम सबळ आहोत आम्ही स्त्रीया....
स्त्रीयांना हिन लेखू नका ती सृष्टीवरचा साज आहे...
जगाच्या इतिहासात कैक स्त्रीयांनी
राज-ताज गाजवलेेले आहेत,
कई कारनामें करून आपल्या
स्त्रीत्वाच दर्शन दिलेले आहे.....
स्त्रीयांना हिन लेखू नका ती सृष्टीवरचा साज आहे...
स्त्रीया काही कमजोर नाही
घोषा, अपाला, विश्ववारा,लोपा, मुद्रा
शची,अश्या कित्येक स्त्रीयांनी विश्वात
नाव अमर केले आहे....
स्त्रीयांना हिन लेखू नका ती सृष्टीवरचा साज आहे...
पौलोमी,व्रांगभणी,रोमया,सुर्या
ममता,जहू,श्रद्धा,यमी कित्येक नावे
आजही चमकत आहे.
त्या कर्तत्वाच्या आकाशातल्या तारका
होवून आजतागायत विचरण करित आहे....
स्त्रीयांना हिन लेखू नका ती सृष्टीवरचा साज आहे...
हल्लीच्या युगात ही स्त्री
यांनी आपले
धृवताऱ्याप्रमाने अढळ स्थान बनविले,
अश्या दिव्य तेजस्वी सावित्रीबाई फुले,
अहिल्याबाई होळकर,इंदिरा गांधी
प्रतिभाताई पाटील यांची श्रेष्ठता
सुवर्णक्षरात झळकत आहे...
स्त्रीयांना हिन लेखू नका ती सृष्टीवरचा साज आहे...
पुरुषांन सावरणारी ही स्त्रीच असते
मंदिरात असो वा संसारात असो,
कृष्णाला राधा पाहिजे,रामाला सीता पाहिजे,
पूजा करतांना वंदना,अर्चना,आरती,
आराधना व श्रद्धा पाहिजे,
शंकराला पार्वती पाहिजे, शिकायला विद्या पाहिजे,
धनवानाला लक्ष्मी पाहिजे, ऋषीमुनिंना शांती पाहिजे,
पोट भरायला अन्नपूर्णा पाहिजे,
दिवसाची सुरवात उषा तर रात्री निशा पाहिजे,
दिवसाची समाप्तीला संध्या पाहिजे,
झोपतांना स्वप्ना पाहिजे, आंधारात ज्योती पाहिजे...
एकट्यापणी प्रेमा ,प्रिती, स्नेहा पाहिजे,
लढायला जया ,विजया ,सौदामिनी पाहिजे,
वार्धक्यात करुणा,माया,ममता, दया पाहिजे,
अपराध केल्यावर क्षमा पाहिजे,
ग्रंथ वाचायला गायत्री गीता दुर्गा पाहिजे,
लहानपणी लेकरांना आई पाहिजे,
स्त्रीविणा पुरुष हा अधूरा आहे.
स्त्रीयांना हिन लेखू नका ती सृष्टीवरचा साज आहे...