गवळण - मथुरेचा हा घाट
गवळण - मथुरेचा हा घाट


गवळण - मथुरेचा हा घाट
गवळण - मथुरेचा हा घाट
चालून ग माझे थकले पाय
दुखते ग माझी पाठ...
गं बाई बाई. ...मथुरेचा हा घाट
मी चढू कशी मथुरेचा हा घाट॥धृ॥
पहाट वारा झोमतोय अंगा
दह्याचा भारी होतोय माठ
गं बाई बाई. ...मथुरेचा हा घाट
मी चालू कशी मथुरेचा हा घाट॥धृ॥
पाय लटपटे कंबर लचके
पदर उडतोय लांब
आली थंडीची ही लाट
गं बाई बाई...मथुरेचा हा घाट
मी चालू कशी...मथुरेचा हा घाट ॥१॥
गेल्या माझ्या सख्या समोर
दिसत प्रेमाची चंद्रचकोर
कान्हाची पाहूनी थकले वाट
गं बाई बाई...मथुरेचा हा घाट
मी चालू कशी...मथुरेचा हा घाट ॥२॥
मज ऊशीर होईल बाजारी
यायचे लवकर अपुल्या घरी
भरेल ना हा यमुनेचा पाट
गं बाई बाई...मथुरेचा हा घाट
मी चालू कशी...मथुरेचा हा घाट ॥३॥
मीनाक्षी किलावत (अनुभूती) वणी