STORYMIRROR

Vaibhav Khade

Romance

2.5  

Vaibhav Khade

Romance

वसंत तू कि शिशिर मी ?

वसंत तू कि शिशिर मी ?

1 min
27.9K


अंध मी अन धुंद तू , स्वैर मी अन बेबंद तू

निमिषमात्र थांबता, गलितगात्र हे ऋतू

अर्घ्य मी अन सूर्य तू, मर्त्य मी अन जीवन तू


का पाहसी असा नयन मजवरी रोखुनी,

आवेग श्वासांचा आवरता, अश्रू ओघळती हुंदक्यांनी.


निश्चल दिग्मूढ स्थायी मी, अन तू सुमनसख्यापरी फुलपाखरू

हताश मी अन निवांत तू, सांग सख्या रे प्रीत कशी हि सावरू ?


तुझसाठी मरू, झुरू कि अन काय करू ?

पतंगापारी झेप घेई मन माझे त्या ज्वालेवरी,

तुझविन राया कशी तयाला आवरू ?


तू दिसता खुले कळी अन तू हसता मन झुले,

तू पाहशी अन माझ्या मनाचे कमळ उमले.


इंद्रधनूपरी प्रसन्न तो दिन, शुभ्र खडे हे ऊन पडे,

काळजाचीही ठोके चुकवी, नजर तुझी जी मजवर पडे.


कृतार्थ वाटे त्या क्षणी अन वाटे तो दिन सोनियाचा,

मीच मग तोलत बसते हिशोब माझ्या सौख्याचा.


मलाच न कळे, वाटे हेवा वा वाटे क्षुद्र याचक मी

प्रीतीच्या या ऋतूंत, वसंत तू कि शिशिर मी ?




Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance