तू असलीस की
तू असलीस की
तू असलीस की वाटतं
काही काळ सारं थांबावं
अगदी श्वासदेखील
त्याचाही आवाज नको
आपल्या दोघात
निशब्द सारं
फक्त तू आणि मी दोघेच,
मग पाऊस बरसेल
मातीचा मंद सुगंध येईल
सूर्यही अस्ताला जाईन
नवा रंग येईल आपल्या मिलनाला
तेव्हा वाटेल
'रंगों में क्या रखा हैं
रंग तो हम ऐसे भी जाएँगे
जब आपके होंठ और हमारे गाल
आपस में मिल जाएंगे'।
अन् तू अडखळशील
रंगात रंगून सार्या
मी ही कुंचला फिरवेन नव्या रंगांचा
तुझं नवं चित्र रेखाटेल
रंगात भिजलेलं
त्या आभाळावर.
खरंच तू असलीस की वाटतं
काही काळ सारं थांबावं...