गरज
गरज


चांदणे आज रडते
नभात आसवांत वाहते
हरवला प्रिय काळ हा
काळजी मग का करते
आज सर ओघळताना
मातीशी नव्याने भिड़ते
रडते सर कोसळताना
अंकुरातुन नव्याने हसते
गरज भिजण्याची मातीला
चिब चिंब धुंद ती धरती
अलगद थेंब स्पर्शती मातीला
मन सुवासाने श्वास गंधाळती
मन आलया भरुन
ओघळते बघुन हिरवळ
गरज मनाला गारव्याची ओढ़े
तनु मोहोरली पानांची सळसळ