STORYMIRROR

Padmini Pawar

Romance

2  

Padmini Pawar

Romance

उतरण

उतरण

1 min
14.5K


उतरणीचा प्रवास नसतो नुसता सुखाचा, असतो अनुभवाचा नि एकलेपणा ...........


सरता सरत नाहीत क्षण मग होते आठवांची उलघडण ह्दयांच्या हळुवार कप्यातून .......


मिठीत घेतात क्षण आसवांच्या बरसातीत हळवं होतं मन आठवंत जुन्या जीर्ण क्षणांना .........


कधी कोण आयुष्याच्या निघुन जाते पुढच्या प्रवासास मागे राहतात वळणावर पाषाण होवुन मागची अडगळ ..........


कंठ येतो दाटुन ऊरही येतो भरुन निखळलेले तारे आठवुन आयुष्य सरता संपना ........


राहते असहाय्य एकाकी जीवन कधी संपते वाट पाहात आढ्याकडे असती नजर ........


ती काळजी करणारा सोबती निघुन गेला ढगाआड पाहतो टक लावुन आकाशात तो प्रवास नजरेचा नि आकाशाचा रोजचाच ........


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance