STORYMIRROR

Padmini Pawar

Tragedy

0  

Padmini Pawar

Tragedy

वेदना पुरुषाची

वेदना पुरुषाची

1 min
559


वेदना पुरुषाची ह्दयांत दडावी

न आसवांत वाहते तळमळतो

कुणा न कळे हसुन वेळ मारावी

रडतो आतुन मनात जळतो


व्यक्त न करता मुकपणे साहतो

पुन्हा लढण्या सामोरा जातो

कधी हळवा कधी माया अखंड

सर्व सोसुनही कर्तव्य निभावतो


माणुसच तो ही पुरुष जरी

वेदनेचा सल मुखावर लपवतो

हसतो रडतानाही हसत जगतो

सल लपवुन पुरुष सोसुन जगतो



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy