मिठी सैल होता.
मिठी सैल होता.
1 min
20.4K
होत्याचे नव्हते झाले
बेभान वाहता वारे
जीवनाची मिठी सैल झाली
हुंकार बोचरे सारे||
अश्रुंचा पुरही ओसरेना
वेदनेची किंकाळी ऐकवेना
जीवनाची मिठी सैल होता
जखमांचे अतिक्रमण हटेना||
किती अन् कसे विसरावे?
घाव निष्ठुर नियतीचे
जगण्याची मिठी सैल झालेली
सांगे महत्व जीवनाचे
सांगे महत्व जीवनाचे||