झुंज
झुंज


एल्गार जाणिवेचा ठायी ठायी संतापला
झुंज एकाकी स्वावलंबी पावलात अडखळता..१..
नसता चित्त स्थिर गोंधळ मनी आवेगला
पहाट काळोखी मंद प्रकाशात तेवता..२..
घूमती वारे अनामिक विचार आक्रंदला
स्वैर दिशा दाही आसमंत हुंकारता..३..
कर्तृत्व खंबीर मनिषा सिद्धीण्या चिंतिला
सत्व लोपले क्षणार्धात सत्यता परखड वाजता..४..
प्रश्न अंतरीचा सदैव एकटा झुंजला
मोकळा श्वास हसला अस्तित्वाचा अर्थ कळता..५..
समाधान रूजले पक्के आनंद गवसला
निर्णय एक ठाम आत्मविश्वासे आयुष्यांगणी भिनता..६..