सावल्या ...
सावल्या ...


काही क्षणांच्या सावल्यांचे ....
खेळ मनभर दाटलेले ...
काही निश्वास विसावलेले ...
एक एक नकळत मिटले ...
काही सावल्यांचे शब्द ...
काळजात उमटले ...
हलके पुसु जाता ...
आेरखडे उमटले ...
काही सावल्यांचे श्वास ...
हलकेच गर्द झाले ...
काही सावल्यांनी जगण्याचे बळ दिले ...
काहींनी सावरल्याचे सोंग केले ...
काही क्षणाच्या सावल्या आल्या आणि गेल्या ...
मनात स्मृतींचा तळ ठोकुन दुर झाल्या ..!!!
सावल्यांचे येणे अन् जाणे विधिलिखित नियतीचे ...
अन् आयुष्याच्या रंगमंचावरील जणू जीणेच कठपुतलीचे ...!!!