वचन...
वचन...
वचने निवडतात
दशरथासारखे
रामासारखे
एकवचनी
सामान्यांना न पेलवणारे
न निभावणारे
कोणाला कळो न कळो
मनाची चाड असणारे
वचने निवडतात
बहुधा...
त्यांना निभावणारे
जगाच्या धूळ पाटीवर
प्राचीन अतिप्राचिन वचने कोरणारे
व्यक्ततेचे शाप
अव्यक्ततेचे पश्चात्ताप करत
वचनेच निवडतात त्यांना निभावणारे
सांत्वना नाही
दुसरा डाव नाही
विफलता नाही
वनवास असूनही
फसवणूक नाही
जणू वचनेच कैकयी होऊन निवडतात रामासारखे
दशरथा सारखे
एकवचनी...