गंधित क्षण...
गंधित क्षण...
मनातल्या उमलत्या ऋतूंचा स्पर्श...
तुझ्या संवेदनांना जागवतो...
अन्
तूच दिलेला चांदण्यांचा बिलोरी आरसा भर मध्यानीही चकाकतो...
असं काळाचं बंधन न पाळणारं
तुझ्या गंधित क्षणांच मन व्यापणारं
देखणे स्वप्न,
माझ्या आकाशी रुजत राहतं,
माझ्या स्वप्नांना कवेत घेत...