एक संध्याकाळ
एक संध्याकाळ
गुलाबी थंडीची एक संध्याकळी
स्वप्न ती रंगवत होती
त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून
गालावरची लाली खुलत होती ……
खुप दिवसांनी दोन पाखरं
अशी एकांतात भेटली होती
ती संध्याकाळ त्यांच्या साठी
गोड स्वप्न घेऊन आली होती ……
वाऱ्याने उडणारी केसांची बट
तिला सारखी छळत होती
शब्दांची त्यांना गरज नव्हती
नजरेची भाषा खुप काही सांगत होती….

