ती …….
ती …….
1 min
11
ती नटत थटत शृंगार करत व्यापार करते देहाचा ती माणूस आहे समजून घे समाजा भावना असतात तिला विचार कर वेदनेचा ……. तिच्या वेदनेला तिच्या किंचाळण्याला नका सर्टिफिकेट देऊ पुरुष पणाचं तिला ना श्रावण. ना वसंत ना फाल्गुण तिचं जग संपते उंबऱ्यातचं……… दुनिया दारीच्या या जगात रात्री देह तिचा चिरडला जातो नसतं तिच्या भावनेशी कोणाचं घेणंदेणं न मिळणारं समाधान तिच्यात शोधलं जातं...... देह झीजवून बदनाम तीच आहे आयुष्य ग्रहनात रोज नव्याने मरण आहे दिल. दोस्ती, दुनियादारी निभावली तरी तिच्यावर न पुसणारा ऐक डाग आहे ……. सुरेखा नंदरधाने ✍️
