आठवणीतील क्षण
आठवणीतील क्षण
1 min
142
आठवण येते तुझ्या सहवासाची
ओल्या चिंब पावसात भिजताना
आठवते मग तुझे ते सुंदर रूप
थेंब पावसाचे हातावर झेलताना …
रिमझिम पाऊस पडला
तो सांजवेळी सुर्यास्ताला
प्रेमगीत गात आल्या सरी
सुखावून गेल्या रानफुलाला ….
गर्दीत राहूनही असतो
एकांताचा तुझा भास
डोळे मिटताच क्षणी
बेधुंद करतो तुझा श्वास ……
सांजवेळी येणारी तुझी स्वप्ने
रात्री डोळ्यांना ओलावतात
पहिल्या भेटीची आठवण करत
कवेत तुझ्या मन ही वेडावतात .....
माझ्या ओठावरचे हसू
साक्ष आहे तुझ्या प्रेमाची
आकाशातील चांदण्या टिपत
आठवते त्या प्रत्येक क्षणांची ….
