बंद मुठीत
बंद मुठीत
1 min
10
तुझे नी माझे बंद मुठीत
मन मग कुठे नी कसे विसावे
उमललेल्या कळीत मिटुन
धुंदल्या क्षणी फुलात सांडावे ….
मनातील हळवे कण टिपून
हलकेच मोहरून एकांती रुसावे
होईल घालमेल मनाची जेव्हा
दाटून मेघ बरसावी आसवे ……
समजूत मनाची घालत
आठवणीत त्याच्या रमावे
उगवत्या रविकिरण सारखे लख्ख होऊनि
काळोख विरहात एकटेच मिटावे ……
