चाफा
चाफा
1 min
7
चाफा पाहतास तू आठवतोस
त्याच्या सारखा तुही दरवळतोस
क्षणीच तू रूपाने तुझ्या छाप पाडत
चाफ्या सारखा तुही भाव खातोस….
डोळे मिटून हळूच फुंकर घालतो
अलगद उमलून मनसोक्त बहरतो
फुलांची गर्दी स्वतःभोवती करत
झाडालाच कधी लपून टाकतो ….
स्वतःला माझ्या हातात सोपवतो
फुल बनून चाफ्याच त्रास देतो
स्वतःच्या आठवणीत गुंतवणू
मुद्दाम लपाछपी चा खेळ खेळतो….
म्हणून चाफा पहिला की तू आठवतो
