मृगजळ
मृगजळ
1 min
14
प्रत्येक क्षणांच्या आठवणीत माझ्या
तू यावे ही गरज कशाला
सुख माझे हिरावून गेला
खोटा भास दाखवतो कशाला ……
चंद्र तारे आहे तुजपाशी
माझ्या अंधाराचा त्रास कशाला
खोटे वागून विश्वास घात केला
त्याचा पचाताप करशील कशाला ……
अश्रूंचा तू माझा हिशोब लाव
चुका तुझ्या मान्य करशील कशाला
कोणी विचारलं तर हसून उत्तर दे
तीच वेडी .मृगजळावर फसली कशाला ……
मनात माझ्या तुझ्या आठवणी
तुझ्या मनात स्मारक माझे
मृतांची आठवण काढशील कशाला
क्षण पुरला नाते तोडाया हे सांगशील कशाला ….
