दाटलेल आभाळ
दाटलेल आभाळ
1 min
131
काल आभाळ दाटून आलं
गुंतलेल्या भावनांना सैल केलं
अंधारात वाटेवरून चालतांना
मन जरासं मोकळं केलं ……
खुप काही बोलायचं होतं
शब्दांना मात्र सावरत होती
विरहाच्या जखमातून ती
वेदनेच्या सरी पाझरत होती ……
सांगु कसा पेटलेला वणवा
दाखवू कसा काळजाचा घाव
धोक्याच्या या दुनियेत
हरवलेलं माझं गाव ……
