ओढ
ओढ
1 min
10
ओढ तुझी अशी लागली
मनी भेटण्याची आस जागली
भान नाही कशाचे मनाला
आठवण येते तुझी प्रत्येक क्षणाला ……
कशी जादू झाली तुझी
मी ना राहिले माझी
बंद डोळ्यात ही रूप तुझे
अशी ओढ लागली तुझी ……
होता स्पर्श तुझ्या आठवणींचा
सुगंध दरवळतो प्रीतीचा
हृदयाचे ठोके वाढवून जातो
येणारा क्षण तो मिलनाचा ……
