तळघर
तळघर
1 min
164
मनातल्या या तळघरात
जपून ठेवले एक रहस्य
माझ्या या अबोल प्रेमाचे
का केले रे तू असे हास्य ….
कोरे ठेऊन पान मनाचे
बंद केले दरवाजे मिलनाचे
जेव्हा वितळेलं मी पण त्याचे
निःशब्द होईल भाव मनीचे ….
आठवणींच्या विश्वात हरवत
दाटले पापण्यात ही पाणी
प्रत्येक वळणावर वळून पहात
आठवत गेली ती प्रेम कहाणी ….
